The Search

The Search

नैरोबी

नैरोबी (Nairobi) ही पूर्व आफ्रिकेच्या केन्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी या शब्दांवरून आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात. नैरोबी शहर केन्याच्या दक्षिण भागात नैरोबी नदीच्या काठावर वसले आहे. २००९ साली येथील लोकसंख्या सुमारे ३३.७५ लाख होती. सध्या नैरोबी हे आफ्रिका खंडामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

Wikipedia · CC BY-SA