The Search
ब्रसेल्स एरलाइन्स
बेल्जियम देशाची विमान वाहतूक कंपनी
ब्रसेल्स एरलाइन्स ही बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ब्रसेल्स एरलाइन्स २००६ साली स्थापन करण्यात आली. १९२३ साली स्थापन झालेल्या व २००१ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या सबीना एरलाइन्सची पुनर्रचना करून २००२ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स व व्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००८ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने ब्रसेल्स एरलाइन्सची ४५ टक्के भागीदारी घेतली.
Wikipedia · CC BY-SA