The Search

The Search

स्तूप

बौध्द धर्मातील शिल्परचना

स्तूप एक बौद्ध शिल्पस्मारक असून येथे चिंचन केले जाते. पॅगोडाप्रमाणे स्तूप सुद्धा बौद्ध अनुयायांचे एक प्रार्थना स्थळ म्हणजे विहार आहे. चैत्य हे विशेषतः मृत व्यक्तीसाठी बांधलेले जाते, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, केस इ. जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचत. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या अनुयायांनी त्यांच्या अस्थी, केस, रक्षा वाटून घेतली आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग जिथे घडले तिथे हे अवशेष पुरून त्यावर स्तूप बांधले. लुंबिनी, बोधगया, कुशीनगर अशा ठिकाणी हे स्तूप आहेत. चैत्य या शब्दाचा अर्थ ढिगारा असा आहे.

Wikipedia · CC BY-SA