The Search
हेलसिंकी विमानतळ
हेलसिंकी विमानतळ हा फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हेलसिंकीच्या १७ किमी उत्तरेस व्हंटा शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील ४थ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. हा विमानतळ १९५२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधला गेला. फिनएरचा हब येथेच स्थित आहे.
Wikipedia · CC BY-SA