The Search
२०२५ हाँग काँग चौरंगी मालिका
२०२५ हाँग काँग चौरंगी मालिका ही एप्रिल २०२५ मध्ये हाँग काँग येथे आयोजित करण्यात आलेली पुरुषांची क्रिकेट मालिका होती. या चौरंगी मालिकेत यजमान हाँग काँग, कुवेत, नेपाळ आणि कतार या चार पुरुष क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. मालिकेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा होता. सर्व सामने मोंग कोक येथील मिशन रोड मैदान येथे खेळविण्यात आले. ही स्पर्धा एकेरी साखळी पद्धतीने खेळविण्यात आली आणि गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.
Wikipedia · CC BY-SA