The Search
जपानमधील बौद्ध धर्म
कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ मध्ये अधिकृतपणे जपानमध्ये बौद्ध धर्माचे प्रचलन सुरू आहे. जपानी समाजाच्या विकासावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे. जपानमध्ये प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म प्रभावशाली आहे. विविध अहवालांनुसार, जपानमध्ये ९६% बौद्ध लोक आहेत. २०१५ च्या जपानी सरकारच्या एका संशोधनानुसार, ६९.८% जपानी लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. ९ कोटी ते १२ कोटी बौद्धांसह जपान हा चीननंतर जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला दुसरा देश आहे.
Wikipedia · CC BY-SA