The Search
लिस्बन
पोर्तुगाल देशाची राजधानी
लिस्बन ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.
Wikipedia · CC BY-SA