The Search

The Search

ल्यों

ल्यों हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व महानगर आहे. हे शहर फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागातील रोन-आल्प प्रदेशाच्या रोन विभागात रोन नदीच्या काठावर वसले असून ते पॅरिसपासून ४७० किमी, मार्सेलपासून ३२० किमी तर जिनिव्हापासून १६० किमी अंतरावर स्थित आहे. २००८ साली ल्यों शहराची लोकसंख्या जवळजवळ ५ लाख तर शहरी भागाची लोकसंख्या १४.२२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.५७ लाख इतकी होती. रोन-आल्प प्रदेश व रोन विभाग ह्या दोन्हींची प्रशासकीय राजधानी ल्यों येथेच आहे.

Wikipedia · CC BY-SA