The Search
माराकेश
माराकेश हे मोरोक्को देशातील एक प्रमुख शहर आहे. मोरोक्कोच्या मध्य भागात ॲटलास पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले माराकेश ऐतिहासिक काळापासून मोरोक्कोमधील सर्वात महत्त्वाच्या ४ शहरांपैकी एक राहिले आहे. सध्या येथील लोकसंख्या सुमारे ९.१ लाख असून माराकेश कासाब्लांका, रबात व फेस खालोखाल मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
Wikipedia · CC BY-SA